IPL Fantasy League: Dream11 मध्ये जिंकण्याची चान्सेस – तथ्य आणि फसवेगिरी

IPL Fantasy League: Dream11

शाळेत असताना गणिताच्या तासाला लक्ष दिलं होतं का उत्तर नाही असेल तर सगळ्यात आधी पश्चाताप करा. ठीक आहे, “तुम्ही Dream 11 किंवा My 11 Circle सारख्या अ‍ॅप्समध्ये गुंतला आहात का? जर होय, तर आधीच्या चुका परत करत आहात का?. कारण गणित मन लावून शिकला असता तर Dream 11 चा नाद लागलाच नसता आणि Dream 11 चा नाद लागला असेलच तर पश्चाताप का करायचा आहे हे बँक अकाउंट बघून समजत असेलच.

IPL fantasy app Dream 11 ची क्रेज 

हो ते कसं IPL आली की सगळ्या दुनियेत आपल्याला Dream 11,My 11 Circle सारखं अशा कंपन्यांच्या जाहिराती दिसायला सुरुवात होते रोहित शर्मा म्हणू नका धोनी म्हणू नका सूर्या, ऋषभ, हार्दिक सगळे कार्यकर्ते खेलो दिमागसे म्हणायला लागतात आणि आपली जनता साडेत च्या मॅचला सात वाजताच मोबाईल घेऊन बसते.

सगळ्यांच्या डोक्यात एकच घुमत असतं टीम लावा आणि एक कोटी जिंका. आता याला बोनस म्हणून lamborghini, Thar गाडी मिळणार याची जाहिरात सुद्धा सुरू झाली आहे. बरं नाही म्हणायला Dream 11 ला आज 49 गेले असं म्हणणारे 10 जण रोज भेटत असतील.

Dream 11 winner कार्यकर्ता

पण कुठल्यातरी बातमीत एक कार्यकर्ता येतो जो म्हणतो एक कोटी जिंकले आणि मग तो या 10 जणांसाठी अमरेंद्र बाहुबली बनतो fantasy app वाले त्याला शिवगामिनी टाईप उचलून घेतात आणि होतोय धुवा पण हा बाहुबली एखादाच असतोय बाकी सगळी कालकीयाची प्रजा.

मेन विषय असा आहे की Dream 11 मध्ये एक कोटी जिंकण आहे अवघड किती अवघड तर एखाद्या छोट्या देशाचा पंतप्रधान होणं आणि अशा ॲप्सवर एक कोटी जिंकण यात पंतप्रधान होणं सोप्प आहे.आता तर सगळ्यात आधी एक सोपी गोष्ट कुठल्याही ॲपच समर्थन नाही तर ही आहे गणिताची माहिती

Dream 11 बेटिंग अप्प की स्किल बेस्ड अप्प.?

Dream 11 किंवा इतर ॲप्स म्हणलं की डोळ्यांसमोर सट्टेबाजी आणि बॅटिंग येतं पण या कंपन्यांनी हा फक्त अंदाजाचा नाही तर डोक लावून खेळायचा खेळ आहे हे सांगितलं आणि कायद्याच्या कचाट्यातून सुमडीत सुटका करून घेतली कंपन्या म्हणाल्या हे बेटिंग ॲप नाही तर हे स्किल बेस्ड ॲप आहे.

एक कोटी रुपये जिंकण्यासाठी तुमचं क्रिकेटिंग नॉलेज जबरदस्त असायला हवं. हे नॉलेज वापरून तुम्ही टीम बनवा आणि एक कोटी जिंका साधं सिम्पल लॉजिक आहे. जर फक्त क्रिकेटिंग नॉलेज च्या जोरावर कोट रुपये जिंकता आले असते तर कॉमेंटेटर्स लोक कशाला कॉमेंट्री करत बसले असते.

त्यांनी सिम्पल मध्ये टीमा लावल्या असत्या खोऱ्यान पैसे ओढले असते. कॉमेंट्री मधल ट्रोलिंग नाही अमुक प्लेयरच कौतुक करा तमुक प्लेयरवर टीकाच करा अशी रिस्क सुद्धा नाही पण हे नुसते जाहिरात करून थांबतात कारण अशा Fantasy App मध्ये जिंकण्यासाठी गणित महत्त्वाच असतं प्रोबॅबिलिटी महत्त्वाची असते.

Dream11 Mega Contest उदाहरण 

Dream 11 च उदाहरण घेऊन समजून घेऊ इथे मेगा कॉन्टेस्ट हे सगळ्यात पॉप्युलर कॉन्टेस्ट आहे या कॉन्टेस्ट मध्ये लाखो कार्यकर्ते स्पर्धक म्हणून सहभागी होतात. कॉन्टेस्टची प्राईज तीन कोटी रुपये असते या कॉन्टेस्टचा जो पहिला विनर असतो त्याला तीन कोटी रुपये मिळतात. पण कोटभर रुपये मिळवण्याची शक्यता नेमके किती असते तर याचे चान्सस जवळपास 0.00005% एवढेच असतात.

अवघड वाटतंय सोपं करून सांगतो कधी पडू नये पण तुमच्या आयुष्यात अंगावर वीज पडण्याचे चान्सेस यापेक्षा 40 पटीने जास्त असतात किती पटीने तर 40 म्हणजे अंगावर वीज पडणं सोप्प आहे पण तीन कोटी जिंकण अवघड.

आता लय मोठी कॉन्टेस्ट आहे प्राईज मनी जास्त आहे म्हणजे जिंकण्याची शक्यता वाढायला पाहिजे ना तर गणित तसं नसतेय उलट प्राईज मनी जास्त सहभागी झालेले कार्यकर्ते जास्त तेवढी जिंकायची शक्यता ता कमी कसं Dream 11 च एका मेगा कॉन्टेस्टच उदाहरण घेऊ नुसतं समजा तुम्ही Dream 11 च एका मेगा कॉन्टेस्ट मध्ये टीम लावली. कॉन्टेस्टचा एकूण प्राईज मनी पाच कोटी रुपये कॉन्टेस्ट मध्ये एकूण 20 लाख कार्यकर्त्यांनी टीमा लावल्यात या कॉन्टेस्टचा जो पहिला विनर असेल त्याला एक कोटी रुपये मिळतील.

Dream11 win chance

आता तुम्ही एक कोटी रुपये जिंकाल याचे चान्सस किती तर मोजण्यासाठी एक सोप्प गणित आहे तुम्ही कॉन्टेस्ट मध्ये एक टीम सबमिट केली आणि एकूण 20 लाख एंट्रीज आल्यात तर एकाला 20 लाखाने डिवाईड केल्यावर जो आकडा येतो ती तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी असते या केसमध्ये हा आकडा 0.0000005 एवढा आहे. 

टक्केवारीमध्ये काढायचं तर याला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच हा आकडा 0.0000005% एवढा येतो जर तुम्ही ही कॉन्टेस्ट रोज पाच वर्ष जरी खेळलात तरी तुमचा जिंकण्याचा चान्स 0.09% शन टक्के एवढाच असेल. म्हणजे एका टक्क्यापेक्षाही कमी आता कार्यकर्त्या असतात हुशार त अशा कॉन्टेस्ट मध्ये एकापेक्षा जास्त टीमा लावतात.

Dream 11 मध्ये तुम्ही एका कॉन्टेस्ट मध्ये जास्तीत जास्त 20 टीम्स लावू शकता 20 टीम्स लावल्यावर कोडभर रुपये मिळवण्याचे चान्सस किती तर आधीचच गणित वापरायचं तुम्ही 20 टीम सबमिट केल्या त्यामुळे तुम्हाला 20 ला 20 लाखान डिवाईड कराव लागेल हा आकडा 0.000001  एवढा येतो.

ही तुमची एक कोटी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी टक्केवारी काढण्यासाठी याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर हा आकडा 0.00001% टक्के एवढा येतो म्हणजे पुन्हा एकदा जिंकण्याची शक्यता एका टक्क्या पेक्षाही कमी त्यात तुमचं नुकसान होण्याची शक्यता जास्त.

कारण मेगा कॉन्टेस्ट मध्ये एका टीमची एंट्री फी जनरली 49 रुपये असते त्यामुळे तुम्ही जर अशा 20 टीम्स लावल्या तर तुमचे 980 रुपये खर्च होतील पण यातली एक कोटी रुपये जिंकण्याची शक्यता एका टक्क्यापेक्षा कमीच असेल मुळात Dream 11 सारख्या ॲप्सवर करोडपती होण्याची शक्यता जवळपास शून्य यातही वेगवेगळे परमुटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स अप्लाय करावे लागतात.

Dream11 Team Combination

Dream 11 वर तुम्हाला दोन्ही टीमचे 22 प्लेयर्स मिळून 11 प्लेयरची एक टीम तयार करावी लागते यासाठी जर तुम्ही सगळे कॉम्बिनेशन ट्राय केले तर ते तब्बल 705432 एवढे येतात यातही तुम्हाला कॅप्टन आणि वाईस कॅप्टन निवडावा लागतो.

आता तुम्ही 11 प्लेयरची टीम बनवली तर त्या एका टीममध्ये कॅप्टन आणि वाईस कॅप्टनचे 110 कॉम्बिनेशन बनवू शकतात जर तुम्ही 7,05,432 ला 110 नं मल्टिप्लाय केलं तर एकूण कॉम्बिनेशन 7,75,97,520 एवढे येतात म्हणजेच तुम्हाला Dream 11 वर गॅरंटेड करोडपती बनण्यासाठी 7,75,97,520  एवढ्या टीम्स बनवाव्या लागतील.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे एखाद्या छोट्या देशाचे पंतप्रधान होण्याचे चान्सेस यापेक्षा जास्त आहेत बघा निर्णय घ्या वेळ गेलेली नाही पण असं असलं तरी काही लोक यात जिंकतातच की त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर पडतात किंवा त्यांची टीम बघताना हा एक प्लेयर आपल्याकडे असता तर आपण डाव मारला असता.

असं वाटून जातं मग यांना जिंकणं कसं शक्य होतंय तर हे गडी त्या प्रोबॅबिलिटीच्या गणितात बसतात इथं थोडा नशिबाचा खेळ असतो पण त्यापेक्षा जास्त म्हणजे बऱ्याचदा अनेक टीम्सला लावण्याचा निर्णय यामागचं कारण असतो आता या प्रोबॅबिलिटी मध्ये येण्यासाठी कित्येक जण पाच पाच वर्ष पैसे लावत राहतात पार स्वतःचं वाटोळ करून घेतात मग एखाद्याच नशीब खुलल्याची बातमी येते आणि बाकीचं पब्लिक नादाला लागत राहतं या नादाचा फायदा फॅटसी गेमिंग ॲप्स कडून घेतला जातो.

एका आकडेवारीनुसार सध्या फॅटसी गेमिंग सह भारतातल मार्केट तब्बल 40 हजार कोटी रुपयांच आहे येत्या काही वर्षात हा आकडा 60 हजार कोटींच्या पलीकडे जाईल अशी ही शक्यता आहे. आपल्या भारतातल्या लोकांची अशा गेम्स मधली क्रेज बघता आयपीएल मध्ये 300 रन्स होण्याच्या आधी हा बिझनेस 60 हजार कोटींच्या पलीकडे जाईल का हाच सध्याचा प्रश्न आहे.

कारण कस आहे एक टीम लावा त्यातले 11 च्या 11 भारी प्लेयर्स खेळले पाहिजेत त्यात कॅप्टन भारी खेळला पाहिजे व्हाईस कॅप्टन भारी खेळला पाहिजे म्हणजेच 11 भारी निवडायचे त्यातले दोन भारी निवडायचे त्यातलाही एक भारी निवडायचा असा सगळा हा गुंता त्यामुळे बाहुबली बनायला जाऊ नका.

आकड्यांच गणित ओळखा जाहिरातीत हा खेळ धोकादायक आहे याची सवय लागू शकते आर्थिक जोखीम आहे हे जितक्या स्पीडन सांगितलं जातय त्याच्या डबल स्पीडन पैसे जातात कारण विषय फक्त नशिबाचा नाही गणिताच आहे तेच गणित ज्याकडे आपण शाळेत असताना दुर्लक्ष केलं होतं